29 30 ​ 31 32
33 Border Animation 34
35 ​ 36 37 ​ -->

"शिक्षण आणि आपण" या ब्लॉग वर सर्व शिक्षणप्रेमींचे स्वागत आहे..

लवकरच आपल्या ब्लॉगवर सुरु होत आहे विद्यार्थ्यांसाठी ONLINE TEST, तसेच पालकांसाठी खास घरचा अभ्यास...

Tuesday 27 October 2020

छान छान गोष्टी - भाग १३

 

दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ 


            एका जंगलात   एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.

         गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती माकड खाली उतरली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळविले. परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे यावरून दोघात वाद सुरु झाला.
 
        म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ, असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे आले. बोक्याला आयतीच संधी चालून आली.  बोक्याने त्यांना लोणी सारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितला. तराजू मिळताच बोक्याने लोण्याचे दोन भाग करून तराजूत टाकले.

         एका पारड्यात लोणी जास्त झाले म्हणून वजन सारखे करतो असे दाखवून त्याने त्या परड्यातले थोडे लोणी खाऊन टाकले. त्यामुळे दुसऱ्या पारड्यात वजन जास्त झाले. मग त्यातील थोडे लोणी खाल्ले. असे करता करता बोक्याने आलटून पालटून एकेका पारड्यातले लोणी खात सर्व लोणी संपविले. माकडांना काहीच लोणी शिल्लक राहिले नाही.  आपण दोघ भांडलो त्याचा फायदा बोक्यानी घेतला. हे त्यांच्या उशिरा  लक्षात आले.

तात्पर्य - दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ

Monday 19 October 2020

छान छान गोष्टी - भाग १२

 

कष्टाचे फळ 


                एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना  कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर  मजा करायचे.

                शेतकऱ्याच्या  मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांचा संसार कसा चालणार ? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचते व तो एके दिवशी आपल्या पाचही मुलांना  जवळ बोलावतो  व त्यांना सांगतो की, "आपल्या पूर्वजांनी शेतामध्ये  एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला  हंडा पुरलेला आहे. मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा  व धन काढून ते आपापसात वाटून घ्या."

             दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांनी सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे शेत खणले आहे तर यात धान्य पेरावे, म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले.

           त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. त्यांनी ते बाजारात  जाऊन विकले व त्यांना भरपूर धन मिळाले.

          गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडिलांना सांगितला. तेव्हा ते बोलले,'मी तुम्हाला याचा धनाबद्दल सांगत होतो. जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील.'

तात्पर्य-  कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते.

Monday 5 October 2020

                                                   

 छान छान गोष्टी - भाग ११  

 अति तिथे माती


         एका  गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे.
त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर  पाणी पिऊन जगायचं.
भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता.

       देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला 'तुला काय हवे ते मग'भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या .
देव म्हणाला 'मोहरा कशात घेणार?"  भिकाऱ्याने झोळी पुढे केली.
मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव  म्हणाला'मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल.

     पण हे लक्षात ठेव जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल .
भिकाऱ्याने जेव्हा अट मान्य केली. देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू  लागला  हळूहळू   झोळी भरत आली, पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना.
       
       मोहरांच्या वजनाने झोळी फटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता.
शेवटी जे व्हायचे तेच झाले. त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात व त्याची माती होते.

      देवही नाहीसा होतो व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरत नाही. 
आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच राहतो.

  तात्पर्य  - कोणत्याही गोष्टीचा अति लोभ करू नये.