29 30 ​ 31 32
33 Border Animation 34
35 ​ 36 37 ​ -->

"शिक्षण आणि आपण" या ब्लॉग वर सर्व शिक्षणप्रेमींचे स्वागत आहे..

लवकरच आपल्या ब्लॉगवर सुरु होत आहे विद्यार्थ्यांसाठी ONLINE TEST, तसेच पालकांसाठी खास घरचा अभ्यास...

आमचा जिल्हा

 आमचा जिल्हा - ठाणे 
                 ठाण्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. भारत देशात पहिली आगगाडी (रेल्वे) ही दि. 16 एप्रिल 1853 साली मुंबई ते ठाणे येथे सुरु झाली. सागरी, डोंगरी व नागरी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभली आहे. ठाणे जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे. 6 महानगरपालिका, 2 नगरपालिका, सिडको, एमआयडीसी आदी नियोजन प्राधिकरणे  असलेला ठाणे हा राज्यातला एकमेव जिल्हा आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. ठाणे जिल्हयात 18 आमदार आणि 3 खासदार एवढे लोकप्रतिनिधी आहेत. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्हयाची ओळख आहे. शहापूर तालुका हा तर धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. केंद्र शासन अंगीकृत दारु गोळा व शस्त्र निर्मिती करणारा कारखाना अंबरनाथ या तालुक्यात आहे. ठाणे जिल्हयातील भिवंडी हे शहर हातमाग यंत्रावर कपडे विणण्यासाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे जिल्हयात 10 औद्योगिक वसाहती विकसित केल्या आहेत. तीन राष्ट्रीय महामार्ग व तीन लोहमार्ग ठाणे जिल्हयातून जातात. तलावांचे शहर अशी ठाणे शहराची ओळख आहे. हाजीमलंगगड, गोरखगड, माहुली इ. ऐतिहासिक किल्ले ठाणे जिल्ह्यात आहेत.

ठाणे जिल्हा नकाशा 

 Map


*ठाणे जिल्ह्यातील तालुकावार नकाशे.*

संबंधित तालुक्याचा नकाशा बघण्यासाठी त्या तालुक्याच्या नावापुढील लिंकवर क्लिक करा.

*अंबरनाथ तालुका नकाशा*
https://goo.gl/59rzZd

*उल्हासनगर तालुका नकाशा*
https://goo.gl/A0v38M

*कल्याण तालुका नकाशा*
https://goo.gl/iMhKix

*ठाणे तालुका नकाशा*
https://goo.gl/3Z9yIm

*भिवंडी तालुका नकाशा*
https://goo.gl/2YCo8d

*मुरबाड तालुका नकाशा*
https://goo.gl/veLeP9

*शहापूर तालुका नकाशा*
https://goo.gl/Ke6yuP


No comments: