29 30 ​ 31 32
33 Border Animation 34
35 ​ 36 37 ​ -->

"शिक्षण आणि आपण" या ब्लॉग वर सर्व शिक्षणप्रेमींचे स्वागत आहे..

लवकरच आपल्या ब्लॉगवर सुरु होत आहे विद्यार्थ्यांसाठी ONLINE TEST, तसेच पालकांसाठी खास घरचा अभ्यास...

Sunday 27 December 2015

आता पुस्तकांचा खजिना आपल्या भेटीला.....

मित्रांनो..!!

मनुष्य-जन्म, आई-वडील, प्राण-वायू आणि ई-साहित्य प्रतिष्ठानची ई-पुस्तके फुकट मिळतात. 
पण म्हणून त्यांना कमी लेखाल तर ती मोठी चूक ठरेल.


या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिका. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. स्वतःच्या घरात. 
सगळं फ़्री आणि ईझी. 
बेसुमार मराठी पुस्तकं वाचा. All Free Marathi books उत्तम दर्जेदार पुस्तकं. कोणताही विषय घ्या. कितीही वाचा. कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही.  ब्रेक्स नाहीत. तुम्ही जर खरे मराठी वाचनाचे भक्त असाल तर याहून मोठा सुखाचा खजिना तुम्हाला इतक्या सहजपणे कुठेही मिळणार नाही.
इथे फ़िरा. बघा. बागडा. क्लिका. वाचा. डाऊनलोड करा. फ़्री मनाने, मनसोक्त. आत्मविश्वासाने. मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे. 

नियमित मराठी ई पुस्तके मिळवण्यासाठी ... आपला ई मेल पत्ता कळवा... esahity@gmail.com 

आनंद...! फ़क्त घेऊ नका. द्या ! आपण डाऊनलोड केलेली मराठी ई पुस्तके वाटा. फ़्री. मेल, ब्ल्युटुथ, पेनड्राईव्ह. सीडी, कोणत्याही स्वरूपात भेट द्या. मस्त गिफ़्ट. मित्रमैत्रिणी, आई बाबा, मुलांना खुश करा. ई पुस्तके म्हणजे केसांत माळलेली फ़ुले. किंवा कानातला अत्तराचा फ़ाया. वजन तर काहीच नाही. आणि आपल्यासोबत इतरांनाही सुखाची पखरण करत जातात. 

ई पुस्तकांशी मैत्री करा आणि मित्रांशी ई-पुस्तकांची ओळख करून द्या. वाचलेल्या पुस्तकांच्या लेखकांना अभिप्राय कळवा. आनंद. फ़क्त घेऊ नका. द्या.

येथे क्लिक करा ..    http://www.esahity.com/

No comments: